दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली

मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावरून शिवसेनेनं राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. 

दंगलीच्या कटाची माहिती असेल तर त्याबद्द्लची माहिती पोलिसांना द्या, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या नावावर राज्यात मोठ्या दंगली घडवण्याचा कट रचण्यात येत आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. 

दरम्यान, शिवसेनेनं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीका करत खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर

-राम मंदिरावरून धमक्या देणाऱ्या मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करू!

-राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट रचतोय!

-‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली’

-दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा