बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”

मुंबई | शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील, अशी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केंद्र सरकारवर केली आहे.

महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करून देतात हा अपराधच आहे, पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वडय़ासारखे उकळून फुटू लागले, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन केंद्रातले सरकार मोठीच मेहेरबानी करत आहे काय?, राज्याच्या कायदा व्यवस्थेची, आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे हे कारस्थान तर नाही ना?, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे? महाराष्ट्रासह देशभरात प्राणवायूअभावी कोरोना रुग्णांचा प्राण गुदमरला आहे. रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या आहेत. त्या चितांवर कोणीच राजकीय तवे शेकवू नयेत. सरकार आणि विरोधकांनी निदान याप्रश्नी तरी एकमताने वागावं, असा शिवसेनेनं अग्रलेखातून दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

तोंडात कोरोनाचे जंतू टाकतो म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

पंजाबच्या गोलंंदाजांवर गब्बर दहाडला; दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय- हेमंत ढोमे

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More