बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने ईडी आणि सीबीआयचं वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणं एवढंच बाकीये”

मुंबई | कोरोनाचं संकट हे अस्मानी की सुल्तानी यावर अधूनमधून खल सुरूच असतो. कोरोना म्हणजे नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर करावं, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे आधीच मांडली आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती वगैरे नसून राज्य सरकारचं अपयश आहे, असं महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचं म्हणणं आहे. तसं असेल तर भाजपने ‘ईडी’, ‘सीबीआय’चे वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणं एवढंच आता बाकी आहे, असा टोला शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यातील विरोधी पक्ष सक्षम व जागरूक आहे. त्यांनी पंतप्रधानांना भेटून किंवा पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त कुटुंबास मदत करावी असे नम्रपणे सांगायला हवं, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

महामारी म्हणून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. या संकटकाळातही अनेकांनी व्यापार केला. लसीकरणातून हजारो कोटींचा नफा कमावलाच. पंतप्रधान केअर फंडातही हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा वापर मृतांना मदत म्हणून कसा करता येईल हे पाहायला हवं, असा सल्ला शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला दिला आहे.

लाखो लोक मेले, तितकेच अनाथ आणि निराधार झाले. कोरोना युद्धात अनेक डॉक्टर्स, शिक्षक, सरकारी पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले आहेत. असंख्य पत्रकार या संकटांचे वार्तांकन करताना मरण पावले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या मलमपट्टीने जखमेचा घाव भरायला मदत होईल. माणुसकीचा धर्म हेच सांगतो, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडातले हजारो कोटी मृतांच्या नातेवाईकांना द्या”

विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय

“विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची रणनीती समोर येईल”

डेल्टा प्लस व्हेरिअंटबाबत WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली ‘ही’ दिलासादायक माहिती

मराठा आरक्षणाच्या या 5 मुद्द्यांचा न्यायालयाने एकदाचा निकाल लावून टाकला, पण आता पुढे काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More