बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो”

मुंबई | ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) राणा दांपत्यासह भाजप (BJP) विरोधात टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

राणा दांपत्याला पुढे करून मुंबईतील वातावरण बिघडवायचं हेच ठरवलं होतं आणि त्याबरहुकूम सगळं घडलं. यामागे भाजपचंच कुचकं डोकं आहे, असा आरोप सामानातून करण्यात आला आहे. तर मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याचा अट्टहास कशासाठी?, असा सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

संसदेत श्रीरामांच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो हे आश्चर्यच आहे, असा खोचक टोला शिवसेनेने (Shivsena) लगावला आहे.

दरम्यान, राम सत्यवचनी होते. हनुमान त्या रामाचा भक्त होता. खोटेपणाच्या पायावर उभ्या असलेल्या नवनीत राणा हनुमान चालिसेचं राजकारण करतात आणि समस्त भाजप या भंपकपणाच्या नौटंकीत टाळ्या वाजवत नाचतोय, असा घणाघात देखील शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…त्यामुळेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला”

मोठी बातमी! भायखळा तुरूंगात नवनीत राणांची तब्येत खालावली

IPL 2022: कृणाल पांड्याची विकेट अन् पोलार्डचं हटके सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ

“…हा तर महाराष्ट्राचा अपमान”; जितेंद्र आव्हाड मंगेशकर कुटुंबियांवर बरसले

“राष्ट्रवादीचा जन्मच शिवसेनेला संपवण्यासाठी झालाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More