बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना आमदार तानाजी सावंतांचं बंड; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी घरोबा

उस्मानाबाद | शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी घरोबा केला आहे. महाआघाडीत आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याने सावंतांनी ही खेळी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तसेच अनिल देसाई यांनीही त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सावंत यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी तानाची सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत हे भाजपचे उमेदवार आहेत. तानाजी सावंत यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विजयाकडे वाटचाल करत आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तानाजी सावंत पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडउघड बोलूनही दाखवली आहे. तसेच त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खटके उडाल्याच्या बातम्याही माध्यमात आल्या होत्या.

ट्रेंडिंग बातम्या-

गडकरी-बावनकुळेंच्या मूळगावीच भाजपला धक्का!

सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध- भगतसिंह कोश्यारी

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा भाजप आमदाराला दणका

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More