मुंबई | जगभरात ‘कोरोना’चे थैमानाचे सुरू असल्याने सरकार आणि प्रशासनाने जास्त गर्दी होऊ यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी व्यायामशाळा, मॉल, जलतरण तलाव, चित्रपटगृहांवर सरसकट बंदी लागू केली. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नका, असं आवहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला त्यांच्याच शिवसैनिकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे.
ठाण्याच्या वर्तकनगर शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आशीर्वादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंञी महोदयांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं आहं.
मिसळ महोत्सवाचं शहरभरात दिमाखदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचं सावट असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे नागरिकांचा जीव धोक्यात घातल्यासारखं आहे.
एकीकडे हिंदू वर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणार्या जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रांवर जिल्हाधिकार्यांनी बंदी घातलेली असताना अशा मिसळ महोत्सवावर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात?, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!
महत्वाच्या बातम्या-
अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी
कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS
Comments are closed.