बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, गॅसच्या दरांबाबत मोठी घोषणा!

नवी दिल्ली | पेट्रोलियम कंपन्यांनी पून्हा एकदा घरगुती गॅसच्या दरात वाढ केली आहे. विना सबसिडी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 859.5 रूपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा केंद्र सरकारने झटका दिला आहे.

एलपीजी गॅसची झालेली दरवाढ ही सोमवारी मध्यरात्री पासूनच लागू करण्यात आली आहे. याविषयी पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितलं आहे. देशाच्या विविध भागात गॅसच्या किंमती वेगवेगळया आहेत.

तेल कंपन्या दर पंधरा दिवसाला एलपीजी गॅसच्या दरासंदर्भात आढावा घेत असतात. कोलकात्यात एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 886 रूपये, मुंबईमध्ये हीच किंमत 859.5 रुपये आहे.

दरम्यान, सततच्या महागाईमुळे मोदी सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या गोष्टी सतत महागाईचे नविन विक्रम रचत आहेत. या महागाई बाबत केंद्र सरकारला विचारलं असता, सरकार आंतरराष्ट्रीय किंमतीवर याचं कारण ढकलत आहे. विरोधकही वाढत्या महागाईवरून सरकारला धारेवर धरत आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

“फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”

गोरे गेलेत पण चोर आलेत; नाना पटोलेंची मोदी सरकारवर टिका, पाहा व्हिडीओ

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचं जगणं मुश्कील झालं”

महिलांबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच तालिबानी हसायला लागले, ‘हा’ व्हिडीओ व्हायरल!

अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या आर्शी खानला सतावतेय नातेवाईकांची चिंता, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More