Top News अकोला महाराष्ट्र

धक्कादायक! भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

अकोला | अकोला जिल्ह्यातील हातरुन येथील भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 9 च्या सुमारास सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकलमध्ये बसलेले असताना, दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून अंदाजे 20 रुपये लुटून नेले.

हातरुन इथे मंगळवारी साप्ताहिक बाजार होता. त्यावेळी ही घटना घडली असून, उपचारासाठी सुभाष अग्रवाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हा प्रकार घडताच सुभाष अग्रवाल यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता आता नाही तर सकाळी तक्रार नोंदवू असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिले.

महत्वाच्या बातम्या-

वीजबिल माफीवरुन नितीन राऊतांकडून फसवणूक, विधानसभेत हक्कभंग आणणार- बबनराव लोणीकर

“अख्खा दिवस गेला पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट किंवा मसेजही दिसला नाही”

योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत

“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या