बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! एकाच दिवसात घेतली तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना लस

नवी दिल्ली | कोरोनानं (Corona) जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीमुळे अनेकांना लस दोन-तीन वेळा देण्यात आल्याचं समोर आलं. अशातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

न्यूझिलंडमधील एका व्यक्तीनं  अवघ्या 24 तासांत 10 वेळा कोरोना लसीचे डोस घेतले आहे. हा धक्कादायक प्रकार समजताच आरोग्य मंत्रालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारामुळे आरोग्य विभागाचं टेंशन आता वाढलं आहे.

व्यक्तीने एका दिवसात अनेक लसीकरण केंद्रांना भेट दिली आणि याशिवाय प्रत्येक डोससाठी पैसेही दिल्याचं समोर आलं आहे. कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ म्हणाले, ‘मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली आहे, आम्ही ही बाब अतिशय गांभीर्याने हाताळत आहोत.

दरम्यान, जर  कोणी लसीचा ओव्हरडोज घेतला असेल तर त्यांनी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही अॅस्ट्रिड काॅर्नफ यांनी सांगतिलं.

थोडक्यात बातम्या – 

“गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपात नाही”

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

“दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल”

‘…हे लावालावी करायचं काम संजय राऊत करतात’; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघाती हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक! केली होती ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More