बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! डिस्चार्ज मिळण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

बीड | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे येणारं नैराश्य दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र त्यासोबतच आत्महत्यांचं प्रमाणही कोरोनाकाळात वाढत आहे. बीडमध्ये एका खासगी रूग्णालयात एक कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत होता. उपचारानंतर त्याला सुट्टी होणार त्याच्या काही तासापूर्वीच त्याने रूग्णालयात फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रामलिंग सानप असं आत्महत्या केलेल्या रूग्णाचं नाव आहे. ते बीड तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी होते. ते मागच्या दहा दिवसांपासून दीप कोरोना रूग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांना सुट्टी देण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी गळफास लावून आत्ममहत्या केली होती. रूग्णालयात झालेल्या या आत्महत्येनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेलं नाही. बीड पोलीस मात्र या घटनेचा तपास करत आहे.

बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण आजार अंगावर काढत आहेत. रुग्ण गंभीर झाल्यानंतर तो उपचारासाठी रूग्णालयात दाखल होतो आहे. त्यामुळे  झालेल्या मृत्यू होत आहे. सध्या अँटीजन टेस्टही कमी होत आहेत. तर लक्षणं दिसल्यानंतरही रुग्ण बाहेर फिरत आहेत. त्यातच रुग्णांसोबत नातेवाईक असतात त्यामुळे संसर्ग वाढत आहे परिणामी रुग्णसंख्या वाढत आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 19 मे पर्यंत बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.99 टक्के इतका होता. तर रुग्णवाढीचा दरही मोठा होता, अशी माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या –

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?”

मोठी बातमी! तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 

…पण मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही- उद्धव ठाकरे

कोरोनानं खासदाराचं कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांच्या अकराव्या-बाराव्याला दोन्ही मुलांचाही मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More