बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! विमान अपघातात ‘टार्झन’ अभिनेता जो लारासह सात जणांचा मृत्यू

मुंबई | 1990 मध्ये गाजलेल्या ‘टार्झन’ मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका निभावणारा कलाकार विल्यम जोसेफ लारा यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. लारा यांच्या विमानाला शनिवारी 28 मे रोजी अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी ग्वेन लारा आणि इतरही काही लोक विमानात होते. यापैकी पत्नी ग्वेन लारा आणि त्यांच्यासह सात जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

जो लारा आपल्या कुटुंबीयांसोबत एका प्रायव्हेट विमानानं प्रवास करत होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आणि नॅशविलेमधील टेनेसी नदीत त्याचं विमान कोसळलं. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमानाचा पार चक्काचूर झाला आहे. मात्र कोणाचाही मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

काऊंटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सात लोकांची ओळख पटली आहे. ब्रैंडन हन्ना, ग्वेन एस लारा, जो लारा, डेविड एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जॉनाथन वाल्टर्स अशी त्यांची नावं आहेत.

दरम्यान, 1989 साली टार्झन या मालिकेतून जो लारा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांची पहिलीच मालिका तुफान गाजली. आजही प्रेक्षक त्यांना टारझन याच नावानं ओळखतात. टारझनच्या यशानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. नाईट वॉर्स, सनसेट हीट, फायनल काउंटडाऊन, आर्मस्ट्रॉन्ग, डेड मॅन रन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास दोन दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

 

थोडक्यात बातम्या – 

गुजरातला 1 हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या- अजित पवार

कोरोनामुक्त झालेल्या माय-लेकीचा पाठलाग करत आईवर गँगरेप, मुलगी वाचली

राज्य सरकारनं उचललं मोठं पाऊल; पुण्यात ‘एवढ्या’ टन ऑक्सीजनची निर्मिती होणार

मोठी बातमी! मराठा समाजाला मिळणार आरक्षणाचा लाभ; राज्य सरकारची मोठी घोषणा

भांडत भांडत बालकनीपर्यंत आले नवरा-बायको अन्…; थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More