औरंगाबाद महाराष्ट्र

धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत चक्क साप निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हदगाव तालूक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काल हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खिचडी खाण्याअगोदर शिक्षकांनी तपासणी केली तेव्हा एका विद्यार्थ्याच्या ताटात हा साप आढळला. त्यामुळे शिक्षकांनी तात्काळ विद्यार्थ्यांना खिचडी खाण्यास मनाई केली, त्यानंतर शिक्षकांनी त्या खिचडीची विल्हेवाट लावली.

विद्यार्थ्यांना खिचडी न खाऊ दिल्याने कुणाच्याही जीवाला धोका नसल्याने शाळा प्रशासनाने सांगितलं. शाळेच्या या बोगस कारभारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनेची माहीती मिळताच नांदेडच्या शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले असून कसून चौकशी चालू आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?, हालचालींना वेग

-धक्कादायक! SBI च्या निष्काळजीपणामुळे लाखो ग्राहकांची महत्वाची माहिती लीक!

-पर्रिकरजी, तुमच्यावर किती दबाव असेल, हे मी समजू शकतो- राहुल गांधी

-टीव्ही प्रेमींसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून तुमचा ‘टीव्ही’ होऊ शकतो बंद

-लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, युपीएची प्रगती- सर्वे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या