बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, सिनेमात सेक्स वर्कर म्हणून दाखवलं!

मुंबई |  अॅमझाॅन प्राईम व्हिडिओ हा ओटीटी प्लॅटफाॅर्म वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. नुकतेच ‘तांडव’ सीरिजमुळे त्यांना भारतीय प्रेक्षकांची माफी मागावी लागली होती. त्यानंतर आता एका चित्रपटामुळे त्यांना मुंबई उच्च न्यायालयाची चपराक बसली आहे. अभिनेत्री साक्षी मलिकने अॅमझाॅन प्राईम विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिला न विचारता चित्रपटामध्ये तिच्या फोटोंचा वापर सेक्स वर्कर म्हणून करण्यात आला. या प्रकरणी तिने मानहानीचा दावा ठोकला आहे. कोर्टानं देखील या तक्रारीची नोंद घेत त्वरीत ती दृश्य डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.

अॅमझाॅन प्राईम व्हिडिओवर ‘व्ही’ हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या चित्रपटानं एक नवा वाद निर्माण केला आहे. या चित्रपटामध्ये साक्षी मलिकचे फोटो सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आले आहेत. अर्थात या सर्व प्रकारामुळं साक्षी संतापली अन् तिनं निर्मात्यांविरोधातच मानहानीचा दावा ठोकला.

कोर्टानं देखील तिच्या तक्रारीची नोंद घेत निर्मात्यांना सुनावलं व ती दृश्य त्वरीत डिलिट करण्याचे आदेश दिले. जर त्यांनी कोर्टाचा आदेशाकडे दुर्लक्ष केलं तर चित्रपटावरच बंदी घातली जाईल अशी तंबी देखील त्यांनी दिली आहे. एखाद्याची परवानगी नसताना त्याचा खासगी फोटो वापरणं अयोग्य आणि पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. तसंच या खटल्यात हा प्रकार बदनामीकारकही ठरू शकतो, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान, कोर्टात साक्षीच्या बाजूने वकील सवीना बेदी यांनी बाजू मांडली. साक्षी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फाॅलो करतात. अशा प्रकारच्या कृत्यामुळे तिची बदनामी झाली आहे, असं सवीना बेदींनी कोर्टात सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

“पळपुट्या मुख्यमंत्र्यांना सैनिकांनी देशासाठी दिलेलं योगदान कसं कळणार?”

…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More