Top News

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

मुंबई | एटीएममधून आता 2 हजार रूपयांची नोट मिळणार नाहीये. रिझर्व्ह बँकेकडून देखील दोन हजारांच्या नोटा मिळणं आता बंद झालंय.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने याला सुरुवात केली असून त्यांनी आपल्या 58 एटीएम मशीनमधून कॅलिबर काढलंय. त्याचप्रमाणे आता 100, 200 आणि 500 रुपयांच्याच नोटा लोड केल्या जाणार असल्याचं इतर बँकांचं म्हणणं आहे.

सेंट्रल बँकेचे मंडल प्रमुख एलबी झा यांच्या सांगण्यानुसार, “अनेक महिन्यांपासून आरबीआयकडूनही 2 हजार रूपयांच्या नोटा मिळत नाहीयेत. बाजारातून सुद्धा शाखांमध्ये या नोटा सध्या फार कमी येतायत. आरबीआयने 2 हजारच्या नोटांची छपाई बंद केल्याचंही आम्हाला समजलंय.”

“यासाठीच 58 एमटीएम मशीनमधून 2 हजारच्या नोटांचं कॅलिबर हटवण्यात आलंय. त्याजागी 500चं कॅलिबर लावण्यात आलंय. जेणेकरून अधिक नोटा लोड करता येतील,” असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या