बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

आज महाराष्ट्रात 8 हजार 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 9 हजार 43 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 188 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 59 लाख 87 हजार 521 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 42 हजार 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 23 हजार 340 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या –

‘भावा गर्लफ्रेंड iphone मागत आहे’; चाहत्याच्या प्रश्नावर सोनूचं भन्नाट उत्तर, म्हणाला….

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना 12वीपर्यंत माेफत शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद”

कोरोनामुक्त गावांमध्ये 10-12वीचे वर्ग पुन्हा सुरु होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकारेंनी दिले ‘हे’ निर्देश

अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणी मुंंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More