बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमध्ये गेल्यापासून मला शांतपणे झोप लागते, कसलीही चौकशी नाही”

पुणे | भाजपमध्ये गेल्यावर सगळी पापं धुतली जातात आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागत नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. त्यातच आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे विरोधकांना आयती संधी मिळाली आहे.

भाजपमध्ये गेल्यापासून शांतपणे झोप लागते, निवांत आहे. कसली चौकशी नाही, असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावरून हर्षवर्धन यांच्या एका वक्तव्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे, असं म्हणतं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.

कार्यक्रमात बोलताना स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर बसल्या बसल्या एकाने विचारलं भाजपमध्ये का गेलात ? बाकी सगळं मस्त आहे. निवांत आहे, चौकशी वगैरे काही नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित सर्वांना हसू आवरता आलं नाही.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरणं दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीचा अर्थ लावला जात आहेत. मी माझ्या भाषणात कोणाचाही उल्लेख केला नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. मावळमधील या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

‘मी एकट्याने पाप केलं असेल तर…’; माफी मागत राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शिवसेना देशातील दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; ‘या’ माध्यमातून मिळाले कोट्यावधी रूपये

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More