बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन्यथा मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलन करेल”

मुंबई | सध्या राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे. परंतू असं जरी असलं तरी तज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुर्वीचेच निर्बंध कायम ठेवले आहे. यावरून ज्या लोकांनी कोरोनाबाधित लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्या नागरिकांसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. आता यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

वारंवार लावण्यात आलेल्या नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबावर हालाखीची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना सर्व निर्बंध पाळून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

जर दोन्ही डोस घेतलेल्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली नाही, तर येत्या 2 ऑगस्टला मुंबईकर ‘सविनय नियमभंग’ आंदोलन करतील, असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्याचप्रमाणे केवळ कोरोनाच्या भितीमुळे किती दिवस दैनंदिन व्यवहार बंद ठेवणार, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

दरम्यान, कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असणाऱ्या नागरिकांचं निर्बंध शिथिल करावेत. या विचाराबाबत कोणाचंही दुमत नाही. याबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फॉर्स मिळून घेतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

 

थोडक्यात बातम्या-

“आता तुमच्या कौशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का?”

राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

साखर झोपेत असताना कोसळली इमारत; दुर्घटनेत 3 ठार तर 7 जखमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; भिडे पूल पाण्याखाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More