बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न मिळाल्यानं प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू होत्या. मात्र, या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे आपले नेते असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेतल्यानं अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या आहेत. अशातच आता पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट या प्रकरणावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी आणि मी एकत्र काम केलं आहे. राजकीय पटलावर एकत्र काम केल्यानं ते माझे सहकारी आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस आहेत. राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. कारण मी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्या टीममध्ये काम करते. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे.

तसेच पक्षाने मला मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टीका केलेली नाही, असं देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एसटीचं कौतुकास्पद पाऊल, आता महिला बस चालवताना दिसणार!

“भारतात कोरोनामुळे 4 लाख नव्हे तर 50 लाख मृत्यू”, या दाव्यानं मोठी खळबळ

सोन्या चांदीचे दर पुन्हा उतरले; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More