Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’- किरीट सोमय्या

मुंबई | महाराष्ट्र सरकारने सीबीआयच्या सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे सीबीआयला आता महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

सरकारच्या निर्णयावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “सीबीआयला महाराष्ट्रात एन्ट्री नाही असं सरकार म्हणतं आहे. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची माहिती सीबीआयच्या हाती लागली, तर सर्व बाहेर येईल अशी भिती त्यांना वाटते.”

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयची परवानगी निर्णय मागे घेतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर कुणीही विरोधात बोललं की हे सरकार त्यांच्या घरी जाऊन त्याला मारहाण करतं. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकतं, असा टोलाही सोमय्या यांनी सरकारला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अटक कोणाला करावी हे विचाराणं यालाच शोधपत्रकारिता म्हणतात का?; हायकोर्टाचा सवाल

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नाही, तर उजेडात होईल- जयंत पाटील

“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंदच आहे”

चेन्नईला ‘सुपर’ धक्का; ‘या’ अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार

स्थायी समितीची सभा घेण्यास हायकोर्टाची परवानगी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या