बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात आता फक्त ‘TATA SAFARI’च दिसणार!

मुंबई | येत्या काही दिवसानंतर इंडियन प्रीमिअर लिग आली आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना कधी एकदा आयपीएलचा थरार सुरू होतो असं झालं आहे. यंदाच्या वर्षी क्रिकेटच्या सामन्यावेळी स्टेडिअममध्ये टाटा सफारी दिसणार आहे. जगप्रसिद्ध असलेल्या टाटा कंपनी नवीन एसयूव्ही ‘टाटा सफारी’ व्हिवो इंडियन प्रीमिअर लीगची अधिकृत भागीदार आहे.

2018 पासून टाटा मोटर्स कंपनी आयपीएल स्पर्धेची अधिकृत भागीदार आहे. ही अधिकृत भागीदार कंपनी चेन्नई, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद येथील स्टेडियमवर नवीन टाटा सफारी सादर करणार आहे. आयपीएलचे सर्व सामने देशातील सहा शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. टाटा कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर सलग चौथ्या दिवशी भागीदारी केली आहे.

यासंदर्भात टाटा मोटर्स कारने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत माहिती दिली आहे. गेल्या 20 वर्षात लोकप्रिय ठरलेली टाटा सफारी ही गाडी आता नव्या स्वरुपात बाजारात आली आहे. एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सटी+, एक्सझेड, एक्सझेड+ या सहा व्हेरियंटमध्ये टाटा सफारीला नव्या रूपात आणि नव्या किंमतीत लाँच करण्यात आलं आहे.

दरम्यान,  टाटा सफारीत 6 ते 7 आसन क्षमता असलेले व्हेरियंट 14.69 लाखात उपलब्ध केले जाणार असून ही गाडी ऑटोमॅटीक ट्रान्समिशनची असणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

बीचवरील हाॅट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे पुजा बात्रा पुन्हा एकदा चर्चेत, पाहा फोटो!

पोलीस हफ्ते कसे वसूल करतात?; आमिरच्या कार्यक्रमातील IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

पवारांकडून पराभव झालेल्या ‘या’ नेत्याला पंढरपूरमध्ये भाजपचं तिकीट मिळणार?

परमबीरसिंग यांना पहिला झटका; सर्वोच्च न्यायालयानं दिला ‘हा’ सल्ला

“देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More