…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले
मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दिवसेंदिवस हे उपोषण चिघळत चालल्याचं दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरु असून छत्रपती संभाजीराजे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. संभाजीराजेंचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. उपोषण सुरु असेपर्यंत काहीही न घेण्याची भूमिका राजेंनी घेतली आहे.
संभाजीराजेंच्या उपोषणाला आज काही वारकरी पाठिंबा द्यायला आले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पहायला मिळालं. यावेळी अनेक अभंग वारकरी संप्रदायाने सादर केले. त्यांचं कौतुक करताना संभाजीराजे भावूक झाल्याचं पहायला मिळाले.
दरम्यान, संभाजीराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळलेले पाहून कार्यकर्तेही निशब्द झाल्याचं पहायला मिळालं. परिसरात शांतता पसरली. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मावळ वारकरी संप्रदायाच्या वतीने राजांच्या आमरण उपोषणाला पाठींबा pic.twitter.com/O9XdHO7qOO
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 28, 2022
थोडक्यात बातम्या –
तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; चक्क गटारीत ओतला रशियन व्होडका, पाहा व्हिडीओ
‘नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती’; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य
युक्रेनच्या संरक्षणासाठी ‘ही’ सुंदरी उतरली मैदानात, पाहा फोटो
“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणलंय, फार मोठा तीर नाही मारला”
“आता भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत”
Comments are closed.