बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेरावं घालावे लागेल’- अतुल भातखळकर

मुंबई | राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली आहे, की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करत आहेत हे देखील त्यांना कळले नाही. केंद्र सरकारवर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागी करा. केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकारला मृतवत म्हणावे का?, असा सवाल उपस्थित करत लवकरच तेरावं घालावे लागेल, अशा आशयाचं ट्विट भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यापुर्वी बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरुन कुंभकर्णाची उपमा देत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ट्विट करत पाटलांनी देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये गेली आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला जाग येणार तरी केव्हा? असा सवाल जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. तसंच ‘वर्ल्ड स्लिप’डे, असं टॅग करत पाटील यांनी सरकारला टोलाही लगावला होता.

इंधन दर वाढ या सर्व घडामोडींमुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. मात्र, आता जयंत पाटलांच्या ट्विटला भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी याआधी केंद्र सरकारवर कोरोना लसीकरणावरून निशाणा साधला होता. कोरोनाची लस आधी देशातील लोकांना द्या आणि मग जगभरात पाठवा. केंद्राचं धोरण भारतात लस नसली तरी चालेल, पण देशभरात पाठवा असं आहे. जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात केंद्र सरकार आघाडीवर आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला होता.

थोडक्यात बातम्या –

दहावी आणि बारावी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या…

‘ती’ 45 मिनटं आमच्यासाठी खूप मोठी…; व्हाॅटस अॅपने मानले यूझर्सचे आभार

धक्कादायक! महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत विहिरीत उडी घेत संपवलं आयुष्य

‘या’ कारणामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार!

एक दोन नव्हे तर सलग तीन वेळा जो बायडन विमानात चढताना पडले, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More