बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून त्यावेळी थांबवला होता दिल्ली आणि बंगळूरूचा आयपीएल सामना

मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्यात बंगळुरूने केवळ 1 धावेने दमदार विजय मिळवला आहे. आरसीबीचा गोलंदाज मोहम्मद सिराजने अखेरच्या षटाकत 14 धावांची गरज असताना केलेल्या यॉर्करच्या अचूक माऱ्यामुळे बंगळुरूला विजय मिळवणं शक्य झालं होतं. बंगळुरूच्या 172 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला 170 धावांवर रोखण्यात आरसीबीला यश आलं. पण या सामन्यात एक निराळी घटना घडली आणि सामना काही काळ थांबवावा लागला.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच एका वेगळ्याच कारणामुळे सामना थांबल्याची घटना घडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यातली पहिली इनिंग संपल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वाळूचं वादळ आलं, त्यामुळे दुसरी इनिंग सुरू व्हायला उशीर झाला. दिल्लीचे ओपनर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात बॅटिंगसाठी येत होते, पण या वाळूच्या वादळामुळे त्यांना पुन्हा डग आऊटमध्ये जावं लागलं.

पहिल्या डावात डिव्हिलियर्सच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने दिल्लीसमोर 171 धावांचा डोंगर उभा केला आहे. दिल्लीकडून शिमरन हेटमायरने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी करत या सामन्यातील दिल्लीचं आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत ठेवलं होतं. सोबत कर्णधार ऋषभ पंतने 58 धावांची संयमी खेळी केली. तर बँगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, मैदानावर जरी काही काळ वाळूचं वादळ आलं असलं तरी या सामन्यात डिव्हिलियर्स आणि शिमरन हेटमायरने सामन्यात चौकार आणि षटकाराचं वादळ आणलं होतं.

थोडक्यात बातम्या-

Shree

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

धोका वाढला! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, जाणुन घ्या मागच्या 24 तासातील आकडेवारी

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

सावधान! महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; जाणुन घ्या धक्कादायक आकडेवारी

“महाराष्ट्रात असेच कठोर निर्बंध कायम ठेवावे लागतील”; टास्क फोर्सचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More