बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला होता. त्यामुळे सगळंच ठप्प पडलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा सगळं हळूहळू चालू होताना दिसत आहे. अशातच राजधानी दिल्लीत 45 दिवसांसाठी खासगी दारु दुकानं बंद असल्याचं समोर येतंय.

राजधानी दिल्लीत नवीन अबकारी धोरणाची अंमलबावणी करण्यात आली आहे. नवीन धोरणाअंतर्गत उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 45 दिवस खासगी दारु दुकाने बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीतील 40 टक्के दुकानं बंद राहतील. यातच मद्यप्रेमींचा थोडासा हिरमुड होणार आहे.

नवीन अबकारी धोरणानुसार, ग्राहकांच्या अनुभवामध्ये सुधारणा करणे, दारू माफियांना आळा घालणं, पायरसी दूर करणं आणि राष्ट्रीय राजधानीत दारू व्यवसाय सुधारवणं हे उद्देश आहेत. दिल्ली सरकारला दारूची दुकानं 32 झोनमध्ये विभागून संपूर्ण शहरात न्याय्य वितरण सुनिश्चित करायचं आहे.

दरम्यान, 45 दिवस दुकानं बंद राहणार म्हटल्यावर मद्यप्रेमींच्या दारुमध्ये तुटवडा पडण्याची शक्यता आहे. मात्र  17 नोव्हेंबरपासून दारूची किरकोळ विक्री सुरू ठेवतील. या काळात सरकारी दुकानंही खुली असतील. जी 16 नोव्हेंबरनंतर बंद होतील.

थोडक्यात बातम्या – 

आंदोलन भोवलं! काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

“आता जनतेच्या न्यायालयातच ‘या’ भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईल”

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; ‘या’ 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी

देसी जुगाड! बैल आणि ट्रॅक्टरशिवाय पठ्ठ्यानं नांगरलं शेत; पाहा व्हिडीओ

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More