बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#T20WorldCup| …म्हणून चहलच्या जागी राहुल चहरला मिळाली संधी; निवडकर्त्यांने दिलं स्पष्टीकरण

मुंबई | बुधवारी बीसीसीआयने आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात 15 जणांना संघात स्थान दिलं गेलं तर, संघात 3 खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहेत. निवड समितीने काही खेळाडूंना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. विराट कोहलीचा हुकमी एक्का असलेल्या यजुवेंद्र चहलला संघात स्थान न दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावर आता निवडकर्त्यांने स्पष्टीकरण दिलं आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि यजुवेंद्र चहलला संधी न दिल्यानं बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यावर आता निवड समितीचे प्रमुख निवडकर्ते चेतन शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिखर धवन भारताचा प्रमुख खेळाडू आहे. पण यावेळी त्याला आराम देऊन दुसऱ्या एखाद्या खेळाडूला संधी देण्याची गरज होती, असं चेतन शर्मा यांनी सांगितलं आहे.

चेतन शर्मा यांनी यजुवेंद्र चहलच्या निवडीवर भाष्य केलं आहे. निवड करताना बैठकीत यजुवेंद्र चहलच्या कामगिरीवर चर्चा झाली. तो चांगली गोलंदाजी करतो पण, त्याच्या गोलंदाजीची गती कमी आहे. तर दुसरीकडे राहुल चहरची गती चांगली असल्यानं त्याला संधी देण्यात आल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आश्विन सातत्याने चांगली गोलंदाजी करू शकतो. भारताला आश्विन सारख्या ऑफस्पिनरची गरज आहे. युएईच्या मैदानावर आश्विन महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे त्याला संधी देण्यात आल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल पंपावर आमदाराची फसवणूक, डिझेल भरल्यावर काही अंतरावरच बंद पडली गाडी

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

चीनची तालिबानला मोठी आर्थिक मदत; मदतीच्या रकमेचा आकडा वाचून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More