बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने केलेल्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. आता आर्यनच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आता न्यायालयाने महत्त्वपुर्ण निकाल दिला आहे.

मुंबई क्रूझ डग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर न्यायालयाने निकाल आज राखून ठेवला होता. त्यानंतर आता काही वेळापूर्वी न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

गेल्या सुनावणीदरम्यान, एनसीबीने न्यायालयाला सांगितले होतं की, आर्यन खान वयाच्या 20 व्या वर्षापासून ड्रग्स घेत आहे. आर्यनचे आंतरराष्ट्रीय औषध विक्रेत्यांशी संबंध आहेत, असं एनसीबीने न्यायालयात सांगितलं आहे. त्यानंतर आर्यनच्या सुटकेचा मार्ग आणखी अवघड झाला होता.

दरम्यान, शाहरुख खानचे चाहते न्यायालयाबाहेर जमले आहेत आणि आर्यन खानच्या जामिनाची मागणी करत आहेत. गेल्या 17 दिवसापासून आर्यन तुरूंगात आहे. त्याच्या जामिनासाठी वकिल अर्ज करत आहे. मात्र, आर्यनचा जामीन पुन्हा फेटाळल्याने आता आर्यनच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More