बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

सांगली |  टी-20 विश्वचषकातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला. पाकिस्तान संघाने दहा विकेट्सनी दमदार विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सुरुवातच खराब झाली आहे. भारताचा पराभव झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजगी व्यक्त केली असून सांगली येथे काही क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्ही फोडला.

ही घटना सांगलीच्या इस्लामपूर मधील पाटील गल्लीतील आहे. तर या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय संघाचा पराभव झाल्याने संतप्त सांगली क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावरच टीव्ही फोडला. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. तसेच ही फुटेज जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्याच्या सुरुवातीलाच सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघाची हार झाली. फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्यानंतर पाकिस्तान संघाने फलंदाजी करत 10 विकेट्सने सामना जिंकला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके ठोकली. फलंदाजीची सर्वाधिक मतदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी 10 आणि 3 रन्स केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने झुंज दिली. यात विराटने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करता न आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर आटोपला.

दरम्यान, सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी भारताचा पराभव झाला असला तरीही भारतीय क्रिकेट खेळाडूंची स्तुती केली आहे. तर काहींनी त्यांच्यावर संताप तसेच नाराजगी व्यक्त केली आहे. अशातच सांगली येथील संतप्त क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्ही फोडल्याने त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

एलपीजी गॅस वापरताय तर तुम्हालाही मिळणार 50 लाखांचा विमा, कसं ते वाचा सविस्तर

“मोदी सरकारनं लसीकरणाची शंभरी साजरी केली, आता इंधन दरवाढीचीही शंभरी साजरी करावी”

नवनीत राणांनी साजरी केली करवाचौथ! खास फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

“शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा.”

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More