लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहितेने केलं असं काही की नवरदेवाने गाठलं थेट पोलीस स्टेशन
उस्मानाबाद | लग्नाच्या काही काळातच नव्याने सुरु झालेला संसार मोडल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो तसेच पाहतो. फसवणुकीच्या घटना देखील आपल्याला ऐकायला मिळतात. याचप्रकारे उस्मानाबाद येथे एक घटना घडली आहे. या प्रकरणात नवविवाहीतेने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे केलं ते ऐकून कोणालाही धक्का बसेल.
उस्मानाबाद येथील एका तरुणाचं लग्न जमलं होतं. कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांवर अक्षदा देखील पडल्या. नववधू घरात आल्याने आनंदाचं वातावरण होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी जे झालं त्याने घरातील आनंद हरपला. नवविवाहीत तरुणीने घरात शौचास जाण्याचं कारण संगितलं आणि बाहेर गेली. मात्र पुन्हा परतलीच नाही.
शौचास गेलेल्या नवविवाहतेची घरतल्यांनी बराच वेळ वाट पाहिली. तरी देखील नवरी घरात न आल्याने त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी नवीन नवरी घरातील सर्व दागिणे घेऊन फरार झाल्याचंं समोर आलं.
दरम्यान, घरातील सून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी फरार झाल्याचं पाहून परिवाराने तिच्या पतीसोबत पोलिसांकडे धाव घेतली. याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी नवरीसोबत 3 जणांना अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, अदानी म्हणाले…
‘…त्यांच्याकडे अमेरिका कट्टर शत्रू म्हणून पाहील’; बायडन यांचं मोठं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; ‘या’ मुद्यांवर राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार
‘ही’ एक चूक संजू सॅमसनला पडली महागात; भरावा लागणार ‘इतक्या’ लाखांचा दंड
खळबळजनक! अदानींच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त
Comments are closed.