Top News महाराष्ट्र

‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!

मुंबई |  अभिनेत्री अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने आपल्या चाहत्यांना तिच्या वाढदिवसाला एक गोड गिफ्ट दिलं आहे. तिने आपला स्वत:चा साखरपुडा (एंगेजमेंट) झाल्याचं आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून जाहीर केलं आहे.

उद्योगपती कुणाल बोनोडेकर याच्याशी तिचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आहे. घरातल्या सगळ्या लोकांशी उपस्थित हा सोहळा दुबाईमध्ये पार पडला. फेब्रुवारी महिन्यात तिने एक फोटो शेअर करत एका नव्या आयुष्याला सुरूवात करतीये, असं म्हटलं होतं. त्याचसोबत त्या फोटोमध्ये कुणालला देखील तिने टॅग केलं होतं. तेव्हापासून ती कुणालबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

2 फेब्रुवारी 2020 रोजी हा साखरपुडा पार पडला. मात्र आपल्या वाढदिवशी सोनालीने ही शुभ वार्ता आपल्या चाहत्यांना तसंच महाराष्ट्राला दिली आहे. पेशाने उद्योगपती असलेल्या कुणालशी तिने आता उर्वरित आयुष्य घालवण्याचं ठरवलं आहे.

सोनाली आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हणते, “आमचा 02. 02. 2020 ला साखरपुडा झाला… आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…!!!”

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

काल दिवसभरात 749 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी… पाहा तुमच्या भागात काल किती रूग्ण मिळाले…

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी परतवून लावायचंय… शासनाला सहकार्य करा- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या