बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते आपले मत मांडताना तसेच आपले अपडेट्स चाहत्यांशी शेअर करताना दिसून येतात. नुकतच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र अमिताभ यांच्या त्या पोस्टनं अनेकांना संभ्रमात पाडलं आहे.

अमिताभ यांनी नुकताच एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटामधील त्यांच्या लूकचा असून या फोटमध्ये अमिताभ यांनी डोक्यावर पगडी, कानात आणि गळ्यात दागिने असा राजस्थानी लूक केलेला दिसत आहे. मात्र हा फोटो पाहून नेटकऱ्यांना हा फोटो अमिताभ यांचा आहे की सोनू सूदचा हा प्रश्न पडला आहे.

अनेकांना हा फोटो पाहून सोनू सूदची आठवण होत आहे. अनेकांनी सोनू सूद तुमच्या सारखाच दिसतो असं म्हटलं आहे. पहिल्यावेळी हा फोटो पाहिल्यावर मला या फोटोमध्ये अभिनेता सोनू सूद आहे असं वाटत असल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलेलं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, थ्रोबॅक फोटो शेअर करत अमिताभ यांनी म्हटलं की, ‘रेशमा और शेरा या चित्रपटाच्या लुक टेस्टचा हा फोटो. हा फोटो 1969 मधील आहे. तेव्हा त्या लूक टेस्टमध्ये माझी निवड झाली होती. अमिताभ यांच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

थोडक्यात बातम्या – 

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

‘…तेव्हा वडिलांच्या औषधांसाठीही पैसे नव्हते’; वडिलांच्या आठवणीत नाना भावूक

“जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला”

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More