Top News खेळ

सौरव गांगुली ‘बीसीसीआय’चा नवा अध्यक्ष, अमित शहांचा मुलगा सचिव???

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष बनणार आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळतंय.

दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे पूत्र आणि गुजरात क्रिकेट बोर्डाचे माजी संयुक्त सचिव जय शहा यांच्याकडे बीसीसीआयच्या सचिवपदाची धुरा सोपवली जाणार आहे.

अरुण ठाकूर यांच्याकडे बीसीसीआयचं खजिनदारपद दिलं जाईल, तर जयेश जॉर्ज यांच्या संयुक्त सचिवपद आणि  माहिम वर्मा यांच्यकडे उपाध्यक्षपद दिलं जाणार आहे.

आयपीएलच्या नव्या चेअरमनचीही घोषणा करण्यात येणार आहे. कर्नाटक क्रिकेट संघाचे प्रतिनिधी ब्रिजेश पटेल यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या