मुंबई | परप्रांतीय मजुरांना आपापल्या घरी सुसरक्षित सोडण्यासाठी केंद्राने विशेष मजूर श्रमिक ट्रेन सुरू करून त्यांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी पावलं टाकली. तसंच राज्य सरकार देखील राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, पर्यटकांना त्यांच्या त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवण्यासाठी पावलं टाकणार आहे..
एसटी बसच्या माध्यमातून अडकलेल्या नारिकांना घरी पोहचवणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसंच याचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंं.
प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यात घरी पाठवायचे आहे. मात्र, हे काम अतिशय शिस्तीत होणे आवश्यक आहे. प्ररप्रांतीय लोकांना जशा याद्या तयार करुन त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तश्याच पद्धतीने राज्यातही लोकांना घरी पाठवण्यात येणार, असं परिवहनमंत्री म्हणाले.
दरम्यान, अनेक राज्यांतले मजुर आता त्यांच्या गावी पोहचत आहे. अशात आता जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना स्वगृही पोहचवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं- राहुल गांधी
आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प
महत्वाच्या बातम्या-
आजच्या घडीला जग कठीण परिस्थितीतून जात असताना बुद्धाची शिकवण मार्गदर्शक ठरेल- राज्यपाल
पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू
कांदा खरेदीबाबत अजित पवारांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी
Comments are closed.