बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सहकारी बँकेचा नफा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 14 टक्क्यांनी वाढला

मुंबई | राज्य सहकारी बँकेच्या नफ्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 14 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सहकारी बँकेचा एनपीए 1.2 टक्क्यांवर असल्याचं राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांनी आणि स्पष्ट केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्य सहकारी बँक नफ्यात आहे.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून राज्य सहकारी बँक नफ्यात असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बँकेच्या एकूण नफ्यात 14 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून राज्य सहकारी बँकेला तब्बल 369 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, राज्य सहकारी बँकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा झाल्याने राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पैसे देण्याचीही राज्य सहकारी बँकेची तयारी असून यासंदर्भातील प्रस्ताव नाबार्डला राज्य सहकारी बँकेतर्फे देण्यात आला आहे.

कोरोनाकाळामध्ये अनेक बँका आर्थिक उलाढाल नसल्याने आणि व्यवहार ठप्प असल्याने संकटात सापडल्या असताना राज्य सहकारी बँकेने सलग चौथ्या वर्षी 369 कोटींचा नफा मिळवल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, आर्थिक मदत मिळवण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या प्रस्तावावर नाबार्ड काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

11 वीच्या प्रवेशाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र अनलॉक मात्र ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसात आढळले तब्बल 695 रुग्ण

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; ‘या’ 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More