बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

मुंबई | महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांचे कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर फिरण्यास परवानगी असणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद असणार आहे. त्यामुळे दारूची दुकानं नेमकी सुरू राहणार की बंद हा प्रश्न मद्यप्रेमींना पडला आहे.

महाराष्ट्रातील दारूची दुकानं ही संचारबंदीच्या काळात पूर्णपणे बंद असणार आहे. तरी मद्यप्रेमी दारूची घरपोच ऑर्डर करू शकतात. राज्य सरकारने नेमून दिलेल्या नियमावलीप्रमाणे दारूची घरपोच डिलिव्हरी करण्यास सरकारतर्फे परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दारूची दुकान बंद होणार की सुरू राहणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याबाबत आता स्पष्टीकरण मिळालं असून नागरिकांना घरपोच दारू देण्याची परवानगी सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानं जरी बंद राहिली तरी मद्यप्रेमींना दारू मात्र मिळणार आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

संचारबंदी काळात दारूचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, जर घरपोच सेवा द्यायची असेल तर अवाच्या सवा भाव लावून दुकान मालक दारूची विक्री करू शकतात. त्यामुळे या सर्वांवर राज्य सरकार अंकुश ठेवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महत्वाची बातमी! संचारबंदीकाळात वाहतुकीसाठीचे निर्बंध काय? वाचा एका क्लिकवर…

निर्बंध असतानाही कटिंगचं दुकान सुरू; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू

‘राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय’; पुण्याच्या महापौरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

संचारबंदीकाळात नागरिकांना प्रवासासाठी पास लागणार का? पोलीस महासंचालकांनी दिलं उत्तर…

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून सुप्रिया सुळेंची ऑनलाईन सभा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More