देश

‘कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं’; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

नवी दिल्ली | मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.

कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही, असं स्वामी चक्रपाणि म्हणालेत.

गायीचं रक्त असणारी कोरोना लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणि यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे.

स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नववर्षाचं स्वागत करताना ‘या’ ६ सूचनांचं पालन करा; अन्यथा होऊ शकते कारवाई

“सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं”

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल तो…- संजय राऊत

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या