बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्युट! हाताला सलाईन असतानाही शिवसेनेचा ‘हा’ खासदार मराठा आंदोलनाला हजर

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी यंदाचं पहिलं मराठा आंदोलन कोल्हापुरात चालू आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे मराठा मूक आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. या सर्वात कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यावर सर्वांच्या उपस्थितीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. अंगात अशक्तपणा असताना देखील धैर्यशील माने मराठा क्रांती मुक आंदोलनात उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतूक केलं आहे.

महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना हाक दिली, प्रकाश आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चितपणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं देखील धैर्यशील माने यांनी बोलताना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार”

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर

‘डाॅक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर उपचार करणार नाही’; आयएमएचा समाजकंटकांना इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More