बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! महिलांना कमजोर समजणाऱ्यांना सणसणीत चपराक – पाहा व्हिडीओ

नागालँड | आपण नेहमीच पाहत असतो की, समाजात असे अनेक लोक असतात जे महिलांना कमजोर समजतात. महिलांपेक्षा आपणच वरचढ आहोत असं त्यांना वाटत असतं. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या डॅशिंगपणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे लोक महिलांना कमकुवत समजतात अशा माणसांना सणसणीत चपराक बसली आहे.

हा व्हिडीओ नागालँडचा असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिला चिखलात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मोठीच्या मोठी जीप उचलून या महिला बाजूला सरवकत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठया प्रमाणावर व्हायरल होत असून युनिफॉर्मवर असलेल्या या महिलांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 18 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

दरम्यान, 5 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. 23 सेकांदाच्या या व्हिडीओनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या –

आकाश ठोसरने शेअर केला कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ, म्हणाला…

विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण

नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…

‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More