सुरत | सुरतमधील एका कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी चालत्या बाईकवर स्टंट करत रोमान्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कपलविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता या कपलनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.
हा व्हिडीओ सूरतच्या पाल भागातील आहे.या व्हिडीओमध्ये अब्दुल रहमान मोहम्मद इम्तियाज हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत दुचाकीवर फिरत होता. पोलिसांनी रस्त्यावर बाईक स्टंट केल्याप्रकरणी रहमानविरोधात कलम 279 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मला नाही माहिती, मी काय चुकीचं केलं . मात्र, मला हे मान्य आहे, की विना हेल्मेट अशाप्रकारचा स्टंट नाही करायला पाहिजे. मला नाही माहिती आमच्याविरोधात कोणी तक्रार केली. मात्र, मी त्या व्यक्तीचे आभार मानतो. ज्याच्या तक्रारीमुळे मला माझी चूक समजली, असं अब्दुल रहमान याने म्हटलं आहे. तसेचनकळत मी हे जे काही केलं, त्यासाठी मी माफी मागतो, असंही तो म्हणाला.
पाहा व्हिडीओ-
Look this video. couple bike stunt with hug and got viral in social media, also challenging @CP_SuratCity @GujaratPolice @GujaratPolice #Surat #bike #BikeStunt pic.twitter.com/PA2R2ouqnR
— પત્રકાર તેજશ મોદી Journalist Tejash Modi (@TejashModiLive) March 11, 2021
थोडक्यात बातम्या-
13 तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या
मला कडक लॉकडाऊन लावण्यास भाग पडू नका- उद्धव ठाकरे
धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी
शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ
Comments are closed.