देश

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे ‘पीएमओ’च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी घेतला आहे.

दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, ‘पीएमओ’च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. नीट तपासून माहिती घ्यावी, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनातील हिंसाचारात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाला होता, अशा आशयाचं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!

“दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट”

दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत

“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या