बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे”

नवी दिल्ली | राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे आहेत, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

पक्षाच्या आताच्या स्थितीमध्ये खरं तर राहुल गांधींनी लढायला हवं होतं परंतू ते मैदान सोडून पळून गेले, असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींंवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे आणि राहुल यांना नेता मानणारे कार्यकर्ते राहुल गांधींबद्दल काय विचार करत असतील? असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्येही राहुल गांधीचा राजीनामा स्वीकारला म्हणण्याची हिम्मत नाहीये, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आयटीच्या मित्रांनो आयुष्य वाया घालवू नका; असं लिहून त्यानं आत्महत्या केली!

-She Is Back, ‘या’ अभिनेत्रीची बिग बाॅस-2 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

-“आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करायला तयार आहोत पण…”

-विराट शब्दाला जागला; ‘त्या’ आजीसाठी केली ही खास गोष्ट

-भारत देश 2022 मध्ये कुपोषणमुक्त होईल- स्मृती इराणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More