बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

अहमदनगर | भाजप नेते आणि खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि नामोल्लेख न करता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. सुजय विखे-पाटील अहमदनगरमधील केडगाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणाऱ्या मांजराची उपमा दिली आहे.

महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी राज्याचे वाटोळे केेले, अशी खोचक टीका सुजय विखे-पाटीलांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा नामोल्लेख न करता केली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आटापीटा सुरू असल्याची टीका यांनी केली आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरूनही सुजय विखे-पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या, मोदींचा अहंकार तुटला, कृषी कायदे मागे घेतले, मोदींचा अहंकार तुटला असे म्हणत महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Goverment) आनंद उत्सव साजरा करते. मात्र, राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांना यशस्वी तोडगा काढता येत नाही, अशी जळजळीत टीका सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.

आपले हे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांचे आनंद साजरे करणाऱ्या या सरकारला दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर हीच उपमा शोभते, असं वक्तव्य सुजय विखे-पाटलांनी केलं आहे. तर मविआमधील मंत्री कर्तव्यशून्य असल्याने जनतेला राज्यातील योजनांचा लाभ मिळत नाही, असा घणाघाती आरोपही सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. (Sujay Vikhe-Patil Criticises Mahavikas Aghadi Goverment)

थोडक्यात बातम्या-

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More