बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुजय विखे पाटलांनी चांगलं काम केलंय, त्यांना चांगला जावई मिळेल”

अहमदनगर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमानिमीत्त आले होते. त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमात बोलताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटलांचं कौतुक केलं आहे. सुजय विखे यांनी केंद्र सरकारची वयोश्री योजना राबवली आहे.

वयोश्री योजनेच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे, की सुजय विखे पाटील यांनी जेष्ठ नागरिकांची चांगली सेवा करत आहेत. त्यांना चांगला जावई मिळेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य सुजय विखे करत असलेल्या कामाची पाेचपावती भेटेल या हेतूनं केलं आहे.

वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत ठरणारी साधने वाटली जाणार जात आहेत. या कार्यक्रमस्थळी चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आहे. चंद्रकांत बोलताना म्हणाले, की सुजय विखे ज्येष्ठांना दिलासा देणारं काम करत आहेत. तसेच ते करीत असलेलं काम हे पुण्यांचं काम आहे.

दरम्यान, सुजय विखे हे केंद्र सरकारने आखलेली योजना आई-वडिलांसमान असलेल्या नागरिकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांनी या कार्यक्रमात सुजय विखेंचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

दिवाळीआधी सोनं पुन्हा महागलं! वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

कॅरेबियन संघासाठी तारणहार धावला! ‘या’ दिग्गज अष्टपैलू खेळाडूची संघात एन्ट्री

गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण

‘जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी…’; गडकरींची कंत्राटदारांना तंबी

डाॅ. शरद पवार! शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ पदवी बहाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More