मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केेलेल्या टीकेला उत्तर देताना कंगणा राणावतने अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला होता. स्त्रीवादावर बोलताना कंगणाने सनीवर टीका केली होती.
सनी लिओनीला आपला आदर्श मानू नये असं म्हणणाऱ्या एका प्रसिद्ध लेखकाची उदारमतवाद्यांनी व्हर्च्युअल लिंचिंग केली होती. सनीला इंडस्ट्रीने आणि भारताने एक कलाकार म्हणून स्वीकारलं. आता अचानक फेमिनिझमला पाठिंबा देणाऱ्यांना पॉर्न स्टार असणं फार अपमानजनक वाटतंय, असं कंगणा म्हणाली होती.
कंगणा राणावतच्या या ट्विटला सनीने सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे. सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे.
हे खूप मजेशीर आहे की ज्या लोकांना तुमच्याबद्दल फार कमी माहिती असते तेच लोक तुमच्याबद्दल सर्वांत जास्त बोलतात, असं सनीने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण; एकाच दिवशी दोन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
“नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही”
…तरच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करा- अजित पवार
“…म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये?, मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक नको”
‘देवेंद्र यांचं नाव पाटील, जाधव असतं तर…’; ब्राह्मण वादावर उदयनराजे संतापले
Comments are closed.