Top News आरोग्य कोरोना देश

“खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराची फी किती घ्यावी हे कोर्ट ठरवू शकत नाही; सरकारनं ठरवावं”

नवी दिल्ली | सरकारी त्याचप्रमाणे खाजगी रूग्णांलयांमध्येही कोरोना रूग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र अनेक खाजगी रूग्णांलयांमध्ये मनमानी किंमत वसूल होत असल्याचं समोर आलं. यावर चाप बसावा यासाठी सुप्रिक कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराची फी किती घ्यावी हे कोर्ट ठरवू शकत नाही ते सरकारनं ठरवावं, असं म्हटलं आहे.

खाजगी रूग्णालयांमध्ये कोविड 19 च्या उपचारांचा खर्च नियंत्रणात यावा याबाबत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सांगितलं की, उपचारांचा खर्च हा प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा आहे. त्यामुळे कोर्ट कोविड 19 च्या उपचारांचा खर्च नियंत्रणात आणू शकत नाही.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला खाजगी रुग्णालयांमधील खर्चाचं नियमन करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कोर्टाने, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सर्व संबंधित पक्ष आणि याचिकाकर्त्यांसमवेत बैठक घेण्यास सांगितलं तसंच मार्गदर्शक तत्त्वे किंवा आदेश जारी करण्याच्या शक्यतेचा विचार करण्यासंदर्भात सूचवलं आहे.

याचिकाकर्ते वकील सचिन जैन यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, कोरोना ही एक जागतिक साथ असून खासगी रुग्णालयं उपचाराच्या नावाखाली मनमानी किंमत आकारत आहेत. यामध्ये काही रुग्णालयं 20-25 लाख रुपये घेत असल्याचं समोर आलं. सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. कोरोना साथीच्या सद्यस्थितीत उपचार महाग होऊ नये, असंही कोर्टाने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या