बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या (BMC Election 2022) तोंडावर सर्वोच्च न्यायलयाने शिंदे सरकारला (Shinde Goverment) मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला सर्वोच्च (Supreme Court) न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. ही निवडणूक बेकायदेशीर असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि राज्यातील सत्तांतर यामुळे मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More