‘पद्मावती’मध्ये हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांना फटकारलं

नवी दिल्ली | पद्मावती सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र दिलेलं नाही, बोर्डाच्या कामात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं सिनोमाविरोधातील याचिका फेटाळलीय.

सिनेमात सन्मानित राणीला नृत्यांगना दाखवण्यात आलं. निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाची परवानगी न घेताच गाणं रीलिज केलं, असा याचिकाकर्त्यांनी दावा केला होता. पण ट्रेलर रीलिज करण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेपास नकार देऊन पद्मावतीविरोधातल्या याचिकाकर्त्यांना फटकारलंय.