बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या ‘त्या’ प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं”

नवी दिल्ली | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. केंद्राने राज्याला आरक्षणाचा अधिकार सोपवला आहे. मात्र 50 टक्यांमध्ये आरक्षण कसं बसवायचं?, असा सवाल राज्य सरकारने केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र सरकारने राज्याला इम्पिरिकल डेटा द्यावा. डेटा न दिल्याने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या 55 हजार आणि देशात 9 लाख ओबीसी विजयी उमेदवारांसमोर अडचण उभारली आहे. ओबीसी समाजाच्या 50 टक्के राजकीय आरक्षणावर पेच निर्माण झाला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. 2018 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला मराठा आरक्षणाच्या पाठवलेल्या प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची केस राज्य सरकार हारलं आहे. यामध्ये केंद्र सरकारने राज्याला मदत करावी. त्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट करावी आणि लसीकरणामध्ये महाराष्ट्राला चांगले सहकार्य करावं ही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

स्टेडियममध्ये सामना बघताना तरूणी पकडायला गेली चेंडू तितक्यात…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; अकरावीची प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More