बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रानडे इन्स्टिट्यूटसंदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणार- खासदार सुप्रिया सुळे

पुणे | पत्रकारांची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा डाव हाणून पाडल्यानंतर आता ही जागा विद्यापीठाला कायमस्वरुपी मिळावी यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी “रानडे बचाव कृती समिती”नं खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. पुण्यातील विधानभवन परिसरात ही भेट झाली.

कृती समितीनं आपल्या मागण्यांचं निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना दिलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या वादासंदर्भात समितीची बाजू जाणून घेतली. आपण यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. समितीचे भारत पाटील, हर्षल लोहकरे, स्टुडंट हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेडकर तसेच इतर जण यावेळी उपस्थित होते.

पत्रकारितेच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं रानडे इन्स्टिट्यूट पुण्यातील एफसी रोडवर स्थित आहे. हे इन्स्टिट्यूट इथून पुणे विद्यापीठ परिसरात हलवण्यात येणार होतं, मात्र आजी-माजी विद्यार्थ्यांनी याला विरोध दर्शवला होता. सध्याच्या बाजारभावानूसार या जागेची किंमत ४०० कोटी रुपये असून ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता, त्यामुळे या विषयाची एकच चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, विद्यार्थ्यी तसेच संघटनांचा रोष पाहता स्वतः उदय सामंत यांनी इन्स्टिट्यूटला भेट दिली होती आणि विषय समजावून घेतला होता, त्याचवेळी त्यांनी विद्यापीठाच्या संमतीने इन्स्टिट्यूट हलवण्याचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली होती, तसेच इन्स्टिट्यूटची जमीन कायमस्वरुपी विद्यापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात काय करता येईल तसेच इन्स्टिट्यूटला इतर सोई-सुविधा मिळाव्या यासाठी एकसदस्यीय समितीची घोषणा केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘नितीन जी तुम्ही खूप प्रेमात बोलता पण…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

‘नितीन गडकरीचं म्हणणं भाजप आणि संघाने ऐकलं तर…’; अशोक चव्हाणांचा भाजपला सल्ला

एसटीचे तिकीट मशीन्स बंद, पुन्हा टिक टिक सुरु, पाहा व्हिडीओ

लहान मुलांच्या लसीकरणात पडणार आणखी एका लसीची भर; ‘या’ वयोगटाला मिळणार डोस

…तर मी त्याच दिवशी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार होतो- छत्रपती संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More