पुणे महाराष्ट्र

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, ईडीचा पायगुण चांगला- सुप्रिया सुळे

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर राज्यातील चित्रं पालटलं. आता शिवसेनेनेला नोटीस आलीय. त्यांच्याकडे आधीच मुख्यमंत्रीपद आहे. बहुतेक शिवसेनेला मोठं काही तरी मिळणार असं दिसतंय, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या मावळमध्ये आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

ईडीचा पायगुण चांगला आहे. सगळं चांगलं घडेल त्यामुळे येऊ द्या नोटीसा, असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला आहे.

आमचं सरकार आल्यावर अनेक दावे केले गेले. भविष्यवाणी वर्तवली गेली. सुरुवातीला सांगितलं हे सरकार सात दिवस टिकेल. त्यानंतर सात महिने टिकेल असं सांगितलं गेलं. आता तर एक वर्ष झालं आहे. आता पुढची पाच वर्षेच काय 25 वर्षेही कधी उलटून जातील, हे कळणारही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

“फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं”

आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल!

पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे

“मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या