बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देव पाण्यात घालून बसलीये, अनाथ झाल्यासारखं वाटतंय”

मुंबई | महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे सरकार सत्तेत आलं. शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाला पण जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळालेले नाहीत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळावा म्हणून मी देव पाण्यात घालून बसलेय, मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. दोन महिने झाले पण अद्याप पालकमंत्री मिळाले नाहीत, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

दरम्यान, सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले. पण तरी आपल्याला पालकमंत्री मिळाला नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More